अभिनेता संजय खापरे यांच्या हस्ते झाले वेबसाईट चे उद्घाटन www.sibapr.com

आजच्या घडीला विविध आशयघन विषयांवर सरासरी १०० ते १२५ मराठी चित्रपट वर्षाला प्रदर्शित होतात. याचा अर्थ साधारण २ ते ३ मराठी चित्रपट प्रत्येक आठवड्यात प्रदर्शित होतात. रसिक प्रेक्षकांना इंग्लिश, हिंदी आणि मराठी मिळून जवळपास ५-६ चित्रपटांचे पर्याय दर शुक्रवारी उपलब्ध होतात. त्यामुळे १ ते २ आठवड्यांचे लाइफ असणाऱ्या मराठी चित्रपटांचा प्रेक्षकवर्ग विभागाला जाउन मराठी चित्रपट व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी होण्यास कमी पडतो. त्यामुळे जास्तीत जास्त प्रेक्षकवर्ग मिळावा या दृष्टीने आपला चित्रपट घरोघरी कसा पोहचवता येईल ही एक मोठी काळजी निर्मात्यांवर येउन पडते आणि त्यावेळेस पब्लिक रिलेशन ही गोष्ट समोर येते. उत्तम कथा, कलाकार आणि तांत्रिकदृष्ट्या उत्तम निर्मिती असूनसुद्धा केवळ चित्रपट जनतेसमोर न पोहचल्याने अयशस्वी होण्याची अनेक उदाहरणे पदोपदी पहावयास मिळत आहेत.

असे होणे टाळण्याचा सर्वात मोठा उपाय म्हणजे पीआर काय असते आणि कोणत्याही चित्रपटास मार्केटिंग किती महत्वाचे आहे हे समजून घेणे होय. हाच मुद्दा महत्वाचे ध्येय मानून नवी मुंबई स्थित सिबा अॅड्स अॅन्ड कम्युनिकेशन चा नवीन उपक्रम सिबा पीआर आणि मार्केटिंग , निर्मात्यांची व्यावसायिक सफलता होण्यासाठी पुढचे पाऊल टाकत आहे.

सिबा अॅड्स ही नवी मुंबईतील एक नामांकित अॅडव्हरटाईझिंग एजन्सी १७ वर्षांपासून प्रिंट, इलेक्ट्रोनिक, आउटडोर मिडीया तसेच डीजीटल मार्केटिंग मध्ये कार्यरत असून आता फिल्म प्रमोशन्स मध्ये सिबा पीआर आणि मार्केटिंग या नावाने कार्यरत होत आहे.

दुर्देवाने आज मार्केट मध्ये चित्रपट पीआर ही सेवा एका विशिष्ठ चौकटीत दिली जात आहे. सिबा या बाबतीत अपवाद असणार आहे आणि चित्रपटाला पूरक आणि अत्यंत गरजेच्या असणाऱ्या सेवा या चित्रपटाच्या आशयाप्रमाणे सानुकूल (customized) पद्धतीने देण्यात येणार आहेत. त्याच प्रमाणे चित्रपट यशस्वी होण्यासाठी फक्त पीआर गरजेचे नसून त्यासाठी मार्केटिंग हेही तितकेच आवश्यक आहे ही भावना निर्मात्यांना पटवून देण्याचे ध्येय सिबा चे आहे. प्रत्येक आठवड्यातील चित्रपटांच्या भाऊगर्दीत आपल्या चित्रपटाचा विशेष मुद्दा प्रेक्षकांच्या मनात घर करण्यासाठी customized मार्केटिंग पद्धतीचा अवलंब करण्यात येईल. या सर्व गोष्टी चित्रपटाचा कसून अभ्यास करून करण्यात येतील. या साठी चित्रपट निर्मितीच्या प्रारंभिक कालावाधीपासूनच सुरुवात करणे गरजेचे असणार आहे हे ध्यानात घेऊन त्यावर अंमलबजावणी केली जाईल. पीआर आणि मार्केटिंग या गोष्टी चित्रपट प्रदर्शित करतानाच करावयाच्या असतात ही रूढी मोडून काढून त्या गोष्टी चित्रपट निर्मिती प्रारंभापासून समांतर पद्धतीने करून चित्रपट अयशस्वी होण्याचे प्रमाण कमी करण्याचे उद्दिष्ट सिबा पीआर आणि मार्केटिंग ने ठेवलेले आहे.

त्यामुळे व्यावसायिक दृष्ट्या यश किंवा अपयश हे निर्मात्यालाच सोसावे लागत असले तरी त्या चित्रपटाच्या जडण घडनेत सामावलेले सर्व कलाकार, तंत्रज्ञ, वितरक इत्यादींचे भवितव्यही त्यास जोडले गेलेले आहे हे विसरता कामा नये.

या प्रसंगी सिबा पीआर आणि मार्केटिंग च्या अधिकृत वेबसाईटचे उद्घाटन लई भारी व दगडी चाळ फेम प्रसिद्ध सिने अभिनेते संजय खापरे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी आपले विचार व्यक्त करताना संजय खापरे म्हणाले ” नवनवीन निर्मात्यांनी चित्रपटाकडे फक्त आवड म्हणून न पाहता व्यवसाय म्हणून पाहण्याची गरज आहे तसेच चित्रपट निर्मिती च्या पाहिल्या टप्प्या पासूनच निर्मात्याला इन फिल्म ब्रांडीग किंवा तत्सम पद्धतीने उत्पन मिळण्यासाठी मार्केटिंग एजेन्सी ने विशेष हातभार लावल्यास निर्माते व्यावसायिक दृष्ट्या सफल होतील ”

” स्वतः चित्रपट निर्मिती केली असल्यामुळे, निर्मिती पासून ते चित्रपट प्रदर्शित करण्यापर्यंतच्या संपूर्ण प्रक्रियेतून निर्मात्यांना कोणकोणत्या आव्हानांना सामोरे जावे लागते, कथाशैली प्रमाणे करावयाचे मार्केटिंग व प्रोमोशन्स या संबंधित असलेला अनुभव याचा वापर करून चांगल्या प्रकारचे रिझल्ट्स देता येतील ”  – सचिन अडसूळ

” एखाद्या फिल्म प्रोजेक्ट साठी पीआर आणि मार्केटिंग चे काम करताना अंडर वन रुफ फॅसेलीटी सिबा ग्रुप च्या मार्फत दिल्याने तो प्रोजेक्ट यशस्वी होईलच पण पैशाची आणि वेळेचीही बचत होईल. याचा फायदा आमच्या ग्राहकांना निश्चितच होईल ” – समीर माळवदे

Please follow and like us: